चांगभलच्या जयघोषात पोहाळेत हनुमान यात्रा . .

चांगभलच्या जयघोषात पोहाळेत हनुमान यात्रा . .

03105
चांगभलं...च्या गजरात पोहाळेत हनुमान यात्रा
भव्य पालखी सोहळा; विविध स्पर्धांना प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

पोहाळे तर्फ आळते, ता. १२ ः हनुमानाच्या नावानं चांगभलं... भैरोबाच्या नावानं चांगभलं..च्या जयघोषात पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शनिवारी श्री हनुमान देवास अभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्रपठण झाले. त्यानंतर देवाची सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. पृथ्वीराज संजय गुरव यांनी मंदिरातील सर्व धार्मिक विधी केले. सायंकाळी साडेपाचला हनुमान देवाची पालखी विविधरंगी फुलांनी सजवली होती. त्यानंतर पालखी सोहळा भैरवनाथ दरा या ठिकाणी भैरवनाथ देवाच्या भेटीस गेला. त्यानंतर सायंकाळी सात विविध वाद्यांच्या गजरात भव्य पालखी सोहळा गावातून निघाला. यावेळी ग्रामस्थ व माहेरवाशिणींची दर्शनासाठी गर्दी झाली. शनिवारी सकाळी नऊ वाजता राजर्षी शाहू कला, क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळाने जनरल बैलगाडी अ ब गट घोडागाडी, आदत बैलगाडी, गावगन्ना बैलगाडी शर्यत, ट्रॅक्टर रिव्हर्स स्पर्धां झाल्या. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. यात्रेनिमित्ताने गावात माऊली फाऊंडेशनने टँकरने गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गल्लोगल्ली केला. ग्रामस्थांना त्याचा मोठा आधार मिळाला. रविवारी (ता. १२) गावात खारी जत्रा झाली. यानिमित्त लाखो रुपयांची उलाढाल झाली. यात्रा पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उद्या (सोमवारी) सांयकाळी लावणी महोत्सव साजरा होणार आहे. महिलांसाठी मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com