पोहाळेत चांगभलच्या जयघोषात हनुमान यात्रा साजरी ..

पोहाळेत चांगभलच्या जयघोषात हनुमान यात्रा साजरी ..
Published on

04607

‘चांगभल..’च्या जयघोषात
पोहाळेत हनुमान यात्रा

सकाळ वृत्तसेवा

पोहाळे तर्फ आळते, ता. ११ ः ‘हनुमानाच्या नावानं चांगभलं.. भैरोबाच्या नावानं चांगभलं..च्या जयघोषात पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाची यात्रा मोठया उत्साहात झाली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी श्री हनुमान देवास महाअभिषेक घालण्यात आला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध मंत्रपठण झाले. त्यानंतर देवाची सांलकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर मंदीरातील धार्मिक विधी झाले. मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले.
सायंकाळी साडेपाचला हनुमान देवाची पालखी विविधरंगी फुलांनी सजविण्यात आली. त्यानंतर वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा भैरवनाथ दरा येथे भैरवनाथ देवाच्या भेटीस गेला. त्यानंतर सांयकाळी सात विविध वाद्यांच्या गजरात भव्य पालखी सोहळा गावातून निघाला. यावेळी ग्रामस्थ, माहेरवाशिणींनी दर्शनासाठी गर्दी केली. रात्री तानाजीराव भोसले वाघेरी (जि. सातारा) यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. रविवारी गावात खारी जत्रा झाली. आज कुस्त्यांचे जंगी मैदान झाले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले .मंगळवारी (ता.१२) सायंकाळी समर्थ कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळातर्फे लावणी महोत्सव होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com