

04672
जोतिबा डोंगर ः येथे जोतिबा विकास आराखड्यातील नगारखान्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
--
जोतिबा मंदिर परिसराचे सौंदर्य खुलणार
२५९ कोटी ५९ लाखांचा निधी; शिखरे, ओवऱ्या, नगारखाना, दीपमाळांची कामे वेगात
निवास मोटे ः सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. २३ ः श्री क्षेत्र जोतिबा मंदिराच्या सर्व शिखरांच्या नूतनीकरणाची कामे मंदिर परिसरातील ओवऱ्या, नगारखाने, दीपमाला यांचे विशिष्ट पद्धतीने सौंदर्य खुलविण्याची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे मंदिराचे सौंदर्य लवकरच खुलणार आहे. मार्चमध्ये या कामांना सुरुवात झाली आहे. मंदिरातील जतन आणि संवर्धन अंतर्गत जोतिबा मंदिर परिसरातील ओवऱ्यांत दगडांचे आणि शिल्पांचे सौंदर्य खुलविण्यासाठी सॅन्ड बालस्टिंग गनव्दारे (वाळूच्या विशिष्ट पद्धत) कामे सुरू आहेत.
जोतिबा विकास आराखड्यासाठी २५९ कोटी ५९ लाखांचा निधी मंजूर झाला असून, सध्या तर पहिल्या टप्प्यातील कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे १७० कोटींची कामे पूर्ण केली जाणार आहेत. या विकास कामांमुळे जोतिबा मंदिर यमाई मंदिर व परिसराचा कायापालट होणार आहे. ओवऱ्यांत दगडी फरशी बसविण्याची कामे सुरू आहेत. जोतिबा मंदिराच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील ही कामे सुरू आहेत. जोतिबा मंदिरासाठी ३२ कोटी, तर यमाई मंदिरासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दोन्ही ठिकाणांची कामे जोरात सुरू आहेत. जोतिबा विकास आराखड्यांतर्गत मंदिरात विद्युतीकरण, अग्निशमन, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच विद्युत रोषणाईची कामे होणार आहेत.
---
पहिल्या टप्यात ही कामे होणार
- डोंगरावर येणाऱ्या पायवाटांचे रुंदीकरण
- दक्षिण दरवाजा ते मुख्य मंदिर मार्गाचे रुंदीकरण होणार
- हुजूरवाडा इमारत परिसरात माहिती केंद्र उभे करणार
- यात्रा ठिकाणाचे व पालखी मार्गाचे विस्तारीकरण होणार
- वाहनांचे पार्किंग, भाविकांसाठी निवास व स्वच्छतागृह
- प्राथमिक आरोग्य सुविधा, अन्नछत्र, प्रसाद विक्री केंद्र
- सांडपाण्याचे व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन
- वृक्षांचे पुनर्रोपण, सोलर प्लँट
- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आदी कामे केली जाणार
कोट
जोतिबा मंदिरात जतन आणि संवर्धन अंतर्गत विकास कामे सुरू आहेत. ही कामे टिकावू व दर्जेदार व्हावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामांवर बारकाईने लक्ष आहे. कामे पूर्ण झाल्यावर मंदिर व परिसराचा कायापालट होणार आहे.
- धैर्यशील तिवले, अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती.
PHJ26B04671, PHJ26B04672, PHJ26B04673
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.