रंकाळा संवर्धनासाठी पालिका प्रशासनास सुबुद्धी यावी यासाठी महाआरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळा संवर्धनासाठी पालिका प्रशासनास सुबुद्धी यावी यासाठी महाआरती
रंकाळा संवर्धनासाठी पालिका प्रशासनास सुबुद्धी यावी यासाठी महाआरती

रंकाळा संवर्धनासाठी पालिका प्रशासनास सुबुद्धी यावी यासाठी महाआरती

sakal_logo
By

72518

पद्माराजे महिला संघटनेतर्फे
रंकाळा तलावाची महाआरती
फुलेवाडी, ता. १ ः ऐतिहासिक रंकाळा तलावाचा विकास करण्याच्या नावाखाली केवळ सुशोभीकरण केले जात आहे. रंकाळा संवर्धनाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रंकाळा वाचविण्यासाठी प्रशासनास देवाने सुबुद्धी द्यावी, यासाठी पद्माराजे महिला संघटनेतर्फे आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रंकाळा तलावाची महाआरती करण्यात आली.
रंकाळा तलावाचा विकास करण्याच्या नावाखाली प्रशासन तलावातच पार्किंगचे काम करेल. शौचालयही बांधण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रंकाळ्याच्या मूळ अस्तित्वालाच धोका निर्माण होईल. तलावात सांडपाणी येत असल्याने पाणी प्रदूषण झाले. हे प्रदूषण थांबविण्याचे सोडून रंकाळा तलावातच बांधकाम केले जात आहे. महापालिका प्रशासनाचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय सोडणार नाही. रंकाळा संवर्धनाच्या कामास आमचा पूर्ण पाठिंबा राहील, असे संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी सांगितले.
या वेळी स्मिता हराळे, गीता भोसले, आरती वाळके, शर्मिला भोसले, शोभा पाटील, अनुराधा पाटील, शीतल पाटील, साधना परब, अलका कोळेकर, शोभा मिठारी, मंगल निकम, सुवर्णा भोसले, पद्मा साळोखे, सोनाबाई पोवार, अनिता पाटील, दुर्वा निकम, सुचित्रा मोहिते, शीला सुतार, भारती जाधव उपस्थित होते.