प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बी.एस .पाटील

प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बी.एस .पाटील

Published on

01535 बी. एस. पाटील
01534 डी. पी. पाटील

प्राथमिक शिक्षक संघाच्या
जिल्हाध्यक्षपदी बी. एस. पाटील

फुलेवाडी : कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी बी. एस. पाटील (भुदरगड) व सरचिटणीसपदी डी. पी. पाटील (राधानगरी) यांची एकमताने निवड झाली. प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सभागृहात झाले. यावेळी संघाचे माजी राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने जाहीर झाल्या. कार्याध्यक्ष भैरवनाथ लहू शिंदे (गगनबावडा) कोषाध्यक्ष सर्जेराव सुतार (करवीर) यांची निवड झाली. यावेळी संघाचे राज्य पदाधिकारी माधवराव पाटील, केशवराव जाधव, संभाजी बापट, बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, बजरंग लगारे, सुकाणू समिती सदस्य शिवाजीराव पाटील, रवींद्र नागटिळे, राजू जुूगूळे, उत्तम सुतार, वसंत जाधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.