नवभारत साक्षरता मोहिम सर्व्हेक्षणावर शिक्षक समितीचा बहिष्कार

नवभारत साक्षरता मोहिम सर्व्हेक्षणावर शिक्षक समितीचा बहिष्कार

Published on

नवभारत साक्षरता मोहीम सर्वेक्षणावर
शिक्षक समितीचा बहिष्कार

फुलेवाडी, ता. १८ः शासनाने नवभारत साक्षरता मोहिमेचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षकांना दिल्या आहेत. या मोहिमेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण समितीने घेतल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी सांगितले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नवभारत साक्षरता मोहिमेनुसार गावातील निरक्षरांना शोधून त्यांना साक्षर करायचे आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज आहे. आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना मानधन तत्त्‍वावर नेमून जर निरक्षरांना साक्षर केले तर ही मोहीम यशस्वी होऊ शकते. पण असे न करता शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून निरक्षरांचे सर्वेक्षण करायचे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. अनेक अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांना अध्यापनास वेळ मिळत नाही. शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. एका एका शिक्षकावर दोन दोन, तीन-तीन वर्गांची जबाबदारी आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्यात अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत. निवडणूक व जनगणना या व्यतिरिक्त कोणतेही काम शिक्षकांना देऊ नये, असे असताना शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामांसाठी वेठीस धरले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com