

विद्योदय विद्यालयाचे
स्नेहसंमेलन उत्साहात
फुलेवाडी : शालेय जीवनात कला जोपासणे महत्त्वाचे आहे. विविध स्पर्धेंत घेतलेला सहभाग व्यक्तिमत्त्व घडवत असतो. यश-अपयशाचा विचार न करता स्पर्धेत उत्साहाने भाग घ्यावा, असे मत उच्च शिक्षण विभागाचे लेखाधिकारी संदीप पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापुरातील विद्योदय विद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एम. जी. वालिखिंडी होते. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आविष्कार सादर केले. वर्षभरातील विविध स्पर्धेंत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक श्रीकांत पोवार यांनी अहवाल वाचन केले. यावेळी सचिव श्रीकांत बनछोडे, खजानीस आर. एम. जौंदाळ, पी. एस. वडगावकर, मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ, सीमा पाटील, उदय सावंत, सुवर्णा वणकुद्रे, नीता चव्हाण, सारिका साळोखे उपस्थित होते. विजया केसरकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत पोवार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.