संयम पाहू नका, रंकाळ्याचे संवर्धन करा

संयम पाहू नका, रंकाळ्याचे संवर्धन करा
Published on

02441

संयम पाहू नका;
रंकाळ्याचे संवर्धन करा

रंकाळाप्रेमींची पालिकेकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

फुलेवाडी, ता. ३ ः कोल्हापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाचे संवर्धन करण्याची मागणी आज रंकाळा प्रेमींनी उपशहर अभियंता एम. जी. फुलारी यांच्याकडे केली.
रंकाळ्यावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी रंकाळा संरक्षण व संवर्धन समितीच्या वतीने वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे, परंतु प्रशासनाने याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. याबाबत सातत्याने मागणी केल्यानंतर उपशहर अभियंता फुलारी यांनी आज रंकाळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन रंकाळाप्रेमींच्या मागण्या जाणून घेतल्या.
रंकाळा समितीचे विकास जाधव म्हणाले, ‘‘चार वर्षांपासून आम्ही रंकाळ्याचे संरक्षण करण्यासाठी मागणी करत आहोत. परंतु प्रशासन त्याबाबत कार्यवाही करत नाही. आता आमच्या संयमाचा अंत न पाहता संवर्धनाचे काम प्रशासनाने करावे.’ किरण पडवळ म्हणाले, ‘वारंवार केलेल्या मागणीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने रंकाळ्याचे मूलभूत प्रश्न मार्गी लावावेत.’ प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई म्हणाले, ‘रंकाळ्यावरील आवश्यक मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुक्तांपर्यंत पाठपुरावा केला जाईल.’ मागण्यांचा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्याची ग्वाही उपशहर अभियंता फुलारी यांनी दिली.
यावेळी संजय मांगलेकर, विजय सावंत, अभिजीत चौगुले, आनंदराव कोरे, राजेंद्र पाटील, धनंजय लिंगम, राजेंद्र इनामदार यांनी रंकाळ्याबाबतच्या मागण्या केल्या. यावेळी रोहित खराडे, धोंडीराम चोपडे, प्रवीण वायचळ, जितेंद्र लोहार, राजशेखर तंबाके, प्रशांत लांबा, हरिदास कालेकर, सत्यजित सागावकर, शकील पाखली, उदय गायकवाड व अनिल भालेकर उपस्थित होते.

मागण्या अशा
- रंकाळा बंदिस्त करावा
- चौपाटी व उद्यानात सुरक्षारक्षकांची नेमावेत
- कुत्री व प्राण्यांना चौपाटी व उद्यानात आणण्यास मनाई करावी
- उद्यानात माळी कर्मचाऱ्याची नेमणूक करावी
- रंकाळा परिसरात सायलेंट झोनची अंमलबजावणी व्हावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com