जनगणना प्रशिक्षण सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी

जनगणना प्रशिक्षण सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी
Published on

जनगणना प्रशिक्षण सकाळच्या
सत्रात घेण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

फुलेवाडी; ता. २८ ः उन्हाचा तडाका तीव्र असल्याने जनगणना प्रशिक्षण सकाळच्या सत्रात घ्यावे. तसेच जनगणना कामासाठी मोबाईल उपलब्ध करून द्यावा; अशी मागणी शिक्षक संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जनगणना काम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे प्रशिक्षण सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत घेतले जात आहे. सध्या उन्हाचा तडाखा तीव्र असल्याने कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे प्रशिक्षण सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तोंदकर व जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी जनगणना अतिरिक्त अधिकारी तेजस्विनी पाटील यांच्याकडे केली.
तसेच दिव्यांग कर्मचारी व गंभीर आजारी असलेले कर्मचारी यांचे जनगणना प्रगणक आदेश रद्द करावेत, कर्मचारी ज्या ठिकाणी सेवा बजावत आहेत त्याच गावातील जनगणना करण्यासाठी त्यांची नियुक्ती करावी, जनगणना कर्मचाऱ्यांना वैयक्तिक आदेश देऊन रजेसह इतर लाभांचा उल्लेख करावा, विमा संरक्षण द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. जनगणना काम करण्यासाठी प्रगणकांना मोबाईलमध्ये जनगणना ॲप डाऊनलोड करावे लागेल. किमान अँड्रॉइड १२.० व्हर्जन असलेल्या मोबाईलमध्येच हे ॲप डाउनलोड होणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे जुने मोबाईल आहेत. त्यामध्ये जनगणनेचे काम होणार नाही. जनगणना यंत्रणेने नवीन मोबाईल उपलब्ध करून द्यावा; अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी जनगणना संचालकांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com