हुपरे हायस्कूलमध्ये पालक मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरे हायस्कूलमध्ये पालक मेळावा
हुपरे हायस्कूलमध्ये पालक मेळावा

हुपरे हायस्कूलमध्ये पालक मेळावा

sakal_logo
By

हुपरे हायस्कूलमध्ये पालक मेळावा
पट्टणकोडोली, ता. २२ : येथील बापूसो हुपरे हायस्कुल, ज्युनिअर कॉलेज व बाल संस्कार प्राथमिक विद्यालयातर्फे माता पालक मेळावा व सत्कार सोहळा झाला.
प्रमुख अथिती म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी पंच श्वेता पाटील आणि अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मृणालिनी सुतार होत्या. श्र्वेता पाटील म्हणाल्या,‘महिला कोणत्याही क्षेत्रात आज कमी नाहीत हे आपण म्हणतो पण यासाठी आपल्या मुलींना तिच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची सूट देतो का?, प्रोत्साहन देतो का? नाही देत. तर प्रत्येक मातेने आपल्या मुलीला प्रोत्साहन देणं गरजेचे आहे.’
सुतार यांनी विद्यार्थीनी कोणकोणत्या क्षेत्रात नाव चमकवत आहेत त्याचे विश्लेषण केले. हॉकी खेळाडू व शाळेची माजी विद्यार्थीनी सृष्टी कुडाळकर हिने मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीनी विविध पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होत्या. महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. अटल टिंकरिंग लॅबमधील काही प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक श्रेया नेर्लेकर यांनी केले. सुत्रसंचालन आदिती मोरे यांनी केले. आभार राजनंदिनी जाधव हिने मानले.