
पट्टणकोडोलीत दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
पट्टणकोडोलीत दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
पट्टणकोडोली, ता. २४ : येथे दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पट्टणकडोली गावचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे सोयी सुविधा उपलब्ध करून देताना ग्रामपंचायतीला कसरत करावी लागत आहे.
स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा ग्रामपंचायतीकडून होणे आवश्यक आहे. सध्या पंचगंगेच्या पाणी प्रदूषणात वाढ झाली आहे. पाण्याची शुद्धता करून ती तपासणी करणे गरजेचे आहे. सध्या गावाला प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याला हिरवट रंग व उग्र वास येत आहे. अशा प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात साथीचा आजार पसरण्यापूर्वी पाणी शुद्धीकरणावर लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
-----------
दोन दिवसांपूर्वीच टीसीएल व तुरटीची उपलब्धता केली आहे. गाळणीगृहातील वाळू ही येत्या चार दिवसांत बदलून घेणार आहोत. नवीन योजनेतील कामे अपुरी असल्याने ती आम्ही ताब्यात घेणार नाही.
-भाग्यश्री कोळी, सरपंच