सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे शिका जलसंवर्धनाचे नवीन तंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे शिका जलसंवर्धनाचे नवीन तंत्र
सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे शिका जलसंवर्धनाचे नवीन तंत्र

सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे शिका जलसंवर्धनाचे नवीन तंत्र

sakal_logo
By

लोगो- एपीजी लर्निंग
सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे शिका
जलसंवर्धनाचे नवीन तंत्र
पुणे, ता. ४ : पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन या विषयवार एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहयोगातून विशेष अभ्यासक्रम सोमवारी (ता. ६) सुरू होत आहे. संशोधक आणि विशेषज्ञांच्या अनुभवातून विकसित झालेला हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. जर्मनीच्या स्टुटगार्ड विद्यापीठात प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ शिक्षक यामध्ये शिकवणार आहे. सार्वजनिक व खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करिअर संधी उपलब्ध असणाऱ्या या क्षेत्रात सध्या प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची वानवा असल्याने हे प्रशिक्षण सुरू केले आहे. यासाठीची पात्रता कमीत कमी दहावी पास आहे.
अधिक माहितीसाठी : ७३५०००१६०२, ९९६०३८२७५१

लोगो- एसआयआयएलसी
मिल्की मशरूम उत्पादन तंत्र शिकण्याची संधी
पुणे, ता. ४ : मशरूम अर्थात अळिंबीमध्ये भरपूर पोषक गुणधर्म असूनही त्याविषयी पुरेशी जागरुकता नसल्याने दररोजच्या खाण्यात वापर कमी होतो. परंतु हॉटेल इंडस्ट्री तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेसमध्ये ओयिस्टर, बटन तसेच मिल्की मशरूमचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने मागणी वाढत आहे. याशिवाय हा व्यवसाय छोट्या जागेत, कमी भांडवलात सुरू करणे शक्‍य असल्याने कोणीही हा व्यवसाय करू शकतो. याविषयी सखोल माहिती देणारे प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण ११ व १२ फेब्रुवारी रोजी आयोजिले आहे. यामध्ये मशरूम उत्पादन पद्धती, स्पॉन उत्पादन, गुंतवणूक, मार्केट आदींबाबत प्रशिक्षण तसेच स्पॉन व मशरूम उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. जेवण व प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क ३७५० रुपये.
प्रशिक्षणाचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट नं. १, बाणेर रोड, औंध, पुणे
नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१