गुटखा कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुटखा कारवाई
गुटखा कारवाई

गुटखा कारवाई

sakal_logo
By

गुटखा वाहतुकीबाबत
रुईच्या दोघांवर गुन्हा
सातारा, ता. १५ : पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला सहा लाख ६३ हजार ८०० रुपयांचा गुटखा व मोटार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वाढे फाटा येथे आज जप्त केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अर्जुन कुमार चव्हाण (वय २१) व विशाल अजित हुल्ले (२२, दोघे रा. रुई, ता. हातकणंगले) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यामध्ये बंदी असलेल्या गुटखा एका गाडीतून पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक मदन फाळके यांच्या नेतृत्वाखाली पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाने वाढे फाटा येथे एका मोटारीची तपासणी केली. त्यामध्ये सहा लाख ६३ हजार ८०० रुपयांचा गुटखा सापडला. पोलिसांनी तो गुटखा व दहा लाख रुपये किमतीची मोटार १६ लाख ६८ हजार ८०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. अन्नसुरक्षा अधिकारी, हवालदार यांनी हा ऐवज जप्त केला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.