विविध क्षेत्रातील महिलांचा लोकमान्य सोसायटीतर्फे सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध क्षेत्रातील महिलांचा लोकमान्य सोसायटीतर्फे सन्मान
विविध क्षेत्रातील महिलांचा लोकमान्य सोसायटीतर्फे सन्मान

विविध क्षेत्रातील महिलांचा लोकमान्य सोसायटीतर्फे सन्मान

sakal_logo
By

31389
पुणे : महिला सन्मान सोहळ्याप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे किरण ठाकूर, सुशील जाधव, हर्षद झोडगे, भालचंद्र कुंटे, बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे आणि पुरस्कारार्थी महिला.

विविध क्षेत्रांतील महिलांचा
लोकमान्य सोसायटीतर्फे सन्मान
पुणे, ता. १८ ः जागतिक महिला दिनानिमित्त वित्तीय सहकार व सामाजिक क्षेत्रातील ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड’तर्फे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
‘लोकमान्य सोसायटी’चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. ‘लोकमान्य अर्थवार्ता’चे सल्लागार संपादक योगेश्वर गंधे यांनी या सन्मानामागची संकल्पना मांडली. ठाकूर यांच्या हस्ते श्रीमती हेमा यादव (वैमनीकॉम, सहकार प्रशिक्षण), वैशाली देशमुख (बांधकाम प्रकल्प), योगिनी पोकळे (सहकारी बँकिंग), अ‍ॅड. सीमंतिनी नूलकर, सातारा (सामाजिक व पर्यावरण), सरला भिरूड (संशोधक), वर्षा कोटफोडे (जतन-संवर्धन), अनघा गाडगीळ (शेती व केटरिंग), शुभांगी कोंढेकर (मुद्रण व प्रकाशन), स्वाती महाळंक (आकाशवाणी निवेदिका व समाजकार्य), शीतल पवार व प्राची कुलकर्णी (पत्रकारिता), अद्वैता उमराणीकर (शिक्षण) यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सन्मानार्थींतर्फे यादव व अ‍ॅड. नूलकर यांनी मनोगत व्यक्त केले. लोकमान्य सोसायटीचे पुणे सहायक क्षेत्रीय व्यवस्थापक हर्षद झोडगे, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्यासह सभासद, खातेदार, हितचिंतक आदी उपस्थित होते. ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘लोकमान्य सोसायटी’चे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांनी आभार मानले.