
‘लोकमान्य सोसायटी’कडून सुलेखनासाठी व्याख्यानमाला
23T32331
‘लोकमान्य मल्टीपर्पज’तर्फे
विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २३ ः मराठी राजभाषा दिनानिमित्त लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे विविध शाळांमध्ये सुलेखनाचे महत्त्व मुलांना समजण्यासाठी ‘देवनागरी लिपी आणि तिचे सौंदर्य’ या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
हे व्याख्यान माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय प्राथमिक विभाग, म. ए. सो. रेणुका स्वरूप प्रशाला, कै. वा. दि. वैद्य मुलींची शाळा, लक्ष्मणराव आपटे प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज, आचार्य श्री. विजय वल्लभ स्कूल, महेश विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, जिजामाता मुलींचे हायस्कूल, डी. ई. एस. प्रायमरी स्कूल, नूतन मराठी प्राथमिक विद्यालय, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय माध्यमिक विभाग, सुंदरबाई राठी प्रशाला, अहिल्यादेवी मुलींची प्रशाला, महेश विद्यालय सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, समाजभूषण बाबूराव फुले माध्यमिक विद्यालय, सुंदरदेवी राठी हायस्कूल, सेंट क्रिप्सन होम कन्याशाळा, मॉडर्न हायस्कूल, विमलाबाई गरवारे माध्यमिक प्रशाला, सरिता विद्यालय, नूतन मराठी विद्यालय मुलींची प्रशाला, अॅड. डी. आर. नगरकर प्रशाला या शाळांमध्ये झाले. शैलेश जोशी यांनी मार्गदर्शन केले. एकूण तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना व्याख्यानाचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांमध्ये सुलेखनाची स्पर्धा झाली. त्यातून प्रत्येक शाळेतून प्रथम तीन विद्यार्थ्यांना ‘लोकमान्य’तर्फे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान ‘लोकमान्य’चे सहायक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे उपस्थित होते. सचिन झगडे आणि योगिनी नांदुरकर यांच्यासोबत विविध शाखांतील शाखाधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.