अंबानी हॉस्पिटल

अंबानी हॉस्पिटल

40562
मुंबई ः कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलतर्फे आयोजित ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी ॲण्ड पर्सनलाइज्ड मेडिसीन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत देशातील विविध तज्ज्ञांचा सत्कार झाला. डावीकडून डॉ. संतोष शेट्टी, डॉ. राजेंद्र बडवे, टीना अंबानी आणि डॉ. राजेश मिस्त्री.


कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलतर्फे
‘हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक’ सुरू
पुणे, ता. ३० ः कर्करोगावरील उपचार आणि देखभालीत आघाडीवर असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने ‘हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक’ सुरू केल्याची घोषणा नुकतीच केली.
हॉस्पिटलने आयोजित केलेल्या ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी ॲण्ड पर्सनलाइज्ड मेडिसीन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत या क्लिनिकचे उद्‍घाटन करण्यात आले. देशात दरवर्षी कर्करोगाच्या जवळपास १४ लाख नवीन केसेसचे निदान केले जाते. कर्करोगावरील उपचारांच्या प्रभावात सुधारणा घडवून आणून या आजाराचे ओझे लक्षणीय प्रमाणात कमी करण्याची क्षमता प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये आहे. आनुवंशिक चाचणी हा प्रिसिजन ऑन्कोलॉजीचा एक महत्त्वाचा घटक आहे. याच्या सहाय्याने व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील जीन म्युटेशन्स ओळखता येतात. हा आजार होण्याची शक्यता आहे अथवा नाही, हे कर्करोगाची लक्षणे दिसून येण्याच्याही आधी समजून येऊ शकते. कर्करोगासाठी उपचार धोरणे विकसित करण्यात हे खूप उपयुक्त आहे.
या परिषदेत जगभरातील आघाडीचे ऑन्कोलॉजिस्ट्स, संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिक एकत्र आले होते. त्यांनी केलेल्या पॅनल चर्चांमध्ये कर्करोगावरील देखभालीतील नवी प्रगती, अभिनव उपचार धोरणे आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजीचे भवितव्य याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
या परिषदेत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्षा टीना अनिल अंबानी यांनी भारत आणि जगभरातील ऑन्कोलॉजी क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व यशवंतांचा सत्कार केला. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे ‘सीईओ’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर’ डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, ‘‘प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये उत्कृष्टता साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांमधून हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. कुशल तज्ज्ञ, अत्याधुनिक सुविधा आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांच्यासह नवे क्लिनिक सुरू करणे ही संस्थेची वचनबद्धता आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com