कॉसमॉस सहकारी बँकेला
१५१ कोटींचा निव्वळ नफा

कॉसमॉस सहकारी बँकेला १५१ कोटींचा निव्वळ नफा

Published on

54449-1
पुणे ः कॉसमॉस सहकारी बॅंकेच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष मिलिंद काळे.

कॉसमॉस सहकारी बँकेला
१५१ कोटींचा निव्वळ नफा
पुणे, ता. १० : कॉसमॉस सहकारी बँकेला ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात ५४१ कोटी रुपयांचा ढोबळ, २१३ कोटी रुपयांचा करपूर्व आणि १५१.४१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे, तर बँकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर) १३.५४ टक्के आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली.
बँकेची ११७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. १०) महर्षीनगर येथे झाली. काळे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सभासदांनी केलेल्या शिफारशीनुसार आठ टक्के लाभांश वाटपास परवानगी देण्याची शिफारस रिझर्व्ह बँकेकडे करण्यात येणार आहे. बँकेच्या ठेवी १७ हजार ६२९ कोटींवर असून बँकेने १३ हजार ११६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय ३० हजार ७४५ कोटींहून अधिक झाला आहे. या सभेत दी सिटी को-ऑप. बँक लि. मुंबई या बँकेच्या कॉसमॉस को-ऑप. बँकेमधील विलिनीकरण योजनेस सभासदांनी बहुमताने मान्यता दिली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडे त्यास मान्यता देण्याबाबत लवकरच शिफारस करण्यात येईल, असे काळे यांनी सांगितले. बँकेचे उपाध्यक्ष प्रवीणकुमार गांधी, ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, अॅड. प्रल्हाद कोकरे, व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे आणि संचालक मंडळातील सर्व संचालक व सदस्य सभेस उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.