

62084
पुणे : तब्बल १४५६ छत्र्यांचा वापर करून दोन दिवसांत हृदयाची प्रतिकृती तयार करण्याच्या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
‘स्टार प्रवाह’च्या विक्रमाची
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद
पुणे, ता. १८ ः स्टार प्रवाह वाहिनीवर ब्लॉकबस्टर ‘वेड’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी (ता. २०) सायंकाळी सातला आहे. यानिमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीने १४५६ छ्त्र्यांचा वापर करून हृदयाची कलाकृती तयार केली आहे. या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली आहे. अभिनेते रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत हा विक्रम झाला.
‘वेड’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले. सत्या आणि श्रावणीची अनोखी प्रेम कथा सर्वांना भावली. याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम करण्यात आला. ‘वेड’ चित्रपटात सत्या आणि श्रावणीचे छत्रीसोबत एक वेगळे नाते आहे. त्यामुळेच या विक्रमासाठी छत्रीची निवड करण्यात आली. रितेश यांनी या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वतः ठेऊन विक्रम पूर्णत्वास नेला.
‘स्टार प्रवाह’ने वेड चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग झाला आहे,’ अशी भावना रितेश यांनी व्यक्त केली. ‘स्टार प्रवाह’चे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘‘वेड चित्रपटाने प्रेक्षकांना खरंच ‘वेड’ लावून दमदार कमाई केली, ही या चित्रपटाची ताकद आहे. या चित्रपटासाठी जागतिक विक्रम करीत स्टार प्रवाह वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.