कारगिल मॅरेथॉन स्पर्धा यंदा १७ सप्टेंबरला
कारगिल मॅरेथॉन स्पर्धा
यंदा १७ सप्टेंबरला
पुणे, ता. १६ : देश-विदेशांतील धावपटूंचे आकर्षण असणारी ‘सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२३’ यंदा १७ सप्टेंबरला होणार आहे. आज झालेल्या स्पर्धेच्या आढावा बैठकीनंतर याबाबतची घोषणा करण्यात आली.
‘सरहद, पुणे’ संस्थेतर्फे सहा वर्षांपासून कारगिल येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाच्या स्पर्धेची आढावा बैठकही कारगिल येथे स्पर्धेचे संयोजन सचिव आणि कारगिलचे जिल्हाधिकारी संतोष सुखदेवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस कारगिलचे नायब तहसीलदार हसन, लडाख अटोनिमिस हिल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे एक्झिक्युटिव्ह मेंबर आगा, ‘सरहद, पुणे’चे प्रतिनिधी रेस डायरेक्टर वसंत गोखले, टेक्निकल रेस डायरेक्टर सुमंत वाईकर तसेच ‘कारगिल’चे शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी, लडाख पोलिसांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गोखले आणि वाईकर यांनी स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. या स्पर्धेत यावर्षी नव्याने समावेश करण्यात आलेल्या १६ आणि १८ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या गटांबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच, मॅरेथॉन मार्गावर तांत्रिकदृष्ट्या करण्यात आलेल्या व्यवस्थेची तसेच वैद्यकीय व्यवस्था, पिण्याचे पाणी, फळांचे रस, सायकलिंग संघटनेचे पायलटस, मार्गावरील वाहतूक सहा तास बंद करण्याची व्यवस्था आदींबाबत माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

