लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

Published on

पाच लाखांच्या लाचप्रकरणी
न्यायाधीशासह चौघांवर गुन्हा

जामीन मिळवून देण्यासाठी केली लाचेची मागणी

सातारा, ता. ११ : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा धनंजय लक्ष्मणराव निकम, खासगी व्यक्ती किशोर संभाजी खरात, आनंद मोहन खरात व एका अनोळखी व्यक्तीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एका महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे.
संबंधित महिलेच्या वडिलांवर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्यांना अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन मिळण्यासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केलेला आहे. तो न्यायाधीश निकम यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. तो जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी किशोर व आनंद यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्यानुसार महिलेकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर तीन व नऊ डिसेंबरला पंचांसमक्ष चाचणी करण्यात आली. त्यामध्ये न्यायाधीश निकम यांनी अन्य दोन संशयितांमार्फत पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या आधारे संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन सरदेशपांडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com