अग्रवाल पिता-पुत्राला जामीन

अग्रवाल पिता-पुत्राला जामीन

Published on

अग्रवाल पिता-पुत्राला जामीन
पुणे, ता. २ ः कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी दबाव आणत चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी हा आदेश दिला. चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न करून त्याचा मोबाईल फोन काढून धमकावल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.