

‘सोनालिका ट्रॅक्टर्स’कडून
१६ हजार ट्रॅक्टर्सची विक्री
पुणे, ता. ७ ः ‘सोनालिका ट्रॅक्टर्स’ने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिलमध्ये
१६ हजार २२३ ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे. कंपनीने ३५.६ टक्के वाढ नोंदवत आतापर्यंतची सर्वोच्च विक्री केली असून, ट्रॅक्टर उद्योगाच्या २७ टक्क्यांच्या सरासरी कामगिरीला मागे टाकले आहे, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
देशातील कृषी क्षेत्राचे वाढते यांत्रिकीकरण आणि अन्नधान्य उत्पादनातील वाढीमुळे तंत्रज्ञान आधारित उत्पादनांची मागणी वाढली आहे. तसेच, तिसाव्या वर्षांत पदार्पण करताना कंपनीने प्रगत कृषी-नवकल्पनांद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर दिला आहे. ‘सोनालिका’ने १९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प आणि प्रगत संशोधन केंद्रामुळे कंपनी भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान विकसित करत आहे, असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले. इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सह-व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, ‘एप्रिलमधील ही विक्रमी विक्री तंत्रज्ञानाधारित शेतीकडे वाढणारा कल दर्शवते. बाजार पेठेत सर्वाधिक वाटा मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये आम्ही अग्रस्थानी आहोत. आमचे उच्च दर्जाचे ट्रॅक्टर्स सर्व प्रकारच्या शेतीकामात विनाअडथळा कामगिरी करत आहेत.’
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.