पन्हाळ्यात कॉइन टाका, पिशवी घ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्हाळ्यात कॉइन टाका, पिशवी घ्या...
पन्हाळ्यात कॉइन टाका, पिशवी घ्या...

पन्हाळ्यात कॉइन टाका, पिशवी घ्या...

sakal_logo
By

03142
पन्हाळा : येथे कापडी वेडिंग मशीनच्या लोकार्पणप्रसंगी मुख्याधिकारी माळी, अधिकाऱ्यांसह इनरव्‍हीलचे पदाधिकारी.

दहा रुपये टाका, कापडी पिशवी घ्या
पन्हाळ्यात वेंडिंग मशीनची सुविधा; लाभ घेण्याचे आवाहन

पन्हाळा ता. ११ ः ‘पाण्याची रिकामी बॉटल टाका.. चॉकलेट घ्या तसेच दहा रुपयांचे कॉइन टाका आणि कापडी पिशवी मिळवा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम पन्हाळा नगरपरिषदेने बुधवारपासून सुरू केला. त्यासाठी प्लास्टिक बॉटल वेंडिंग मशीन तीन दरवाजा या व्यापारी परिसरामध्ये तर कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसस्थानक परिसरामध्ये बसवले आहे. प्लास्टिकच्या पिशवीला पर्याय म्हणून प्रशासनाने कापडी मशीन बसून नागरिकांना सुविधा दिली आहे. रिकाम्या प्लास्टिक बॉटल पर्यटकांनी, नागरिकांनी इतरत्र कुठेही न टाकता प्लास्टिक बॉटल वेंडिंग मशीनचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी केले.
राज्य शासनामार्फत राज्यात २०१८ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी शहरात नियमित होताना दिसते. यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात वारंवार प्लास्टिकविरोधी मोहीम राबवली जाते. प्लास्टिक साठा, प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई नगरपरिषदेने केली आहे. एकीकडे प्लास्टिक कॅरीबॅगला बंदी घालत असताना त्याला पर्याय देण्याची मागणी नागरिकांतून होत होती. यापूर्वी नगरपरिषद, युनियन बँकेच्या सहकार्याने नगरपरिषदतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. दरम्यान, इनरव्हील क्लब कोल्हापूरकडून सीएसआर फंडातून दोन्ही मशीन नगरपरिषदेस सुपूर्त केल्या. यावेळी इनरव्हील क्लब कोल्हापूरचे पदाधिकारी, प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल आणि नगरपरिषद अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.