कचऱ्यातून फुलले उद्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचऱ्यातून फुलले उद्यान
कचऱ्यातून फुलले उद्यान

कचऱ्यातून फुलले उद्यान

sakal_logo
By

03152, 03153, 03154
पन्हाळा : येथे पुठ्यापासून बनवलेली कचरा गाड, टेबल खुर्ची, उद्यानातील सुंदर परिसर.

कचरा डेपोस उद्यानाचे रूप
पन्हाळगडावर निर्मिती; सफाई कर्मचाऱ्यांनी केला टाकाऊ वस्तूंचा वापर
आनंद जगताप : सकाळ वृत्तसेवा
पन्हाळा, ता. १५ : निसर्ग सुंदर पन्हाळगडावरील पागा इमारतीजवळील नगरपरिषदेचा कचरा डेपो... कचराडेपो म्हटलं की दुर्गंधी, घाण...त्यावर बसणाऱ्या माशा.. वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी...चित्र नजरेसमोर येते. पण हा कचरा डेपो वेगळाच झाला आहे...इथे गावची घाण, दुर्गंधी, तर सोडाच पण मन प्रसन्न करणारं वातावरण तयार करण्यात आलं आहे. हे तयार केलं आहे सफाई कर्मचाऱ्यांनी....तेही टाकाऊ वस्तूंपासून.
उद्यानात प्रवेश करताच दिसते कचरा गाडी; टायर आणि कागदी पुठ्यापासून बनवलेली.. सुंदर रस्ता.. रस्त्याकडेला विविध प्रकारची झाडे...त्यांना वीटांऐवजी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून पाणी साठवण्यासाठी आळे केले आहे. समोरच प्लास्टिकच्या बाटल्यांनी बनवलेल्या भिंतीची आणि गवताने शाकारलेली प्रसन्न मराठमोळी झोपडी. दुसरी झोपडी विजेच्या जळलेल्या ट्यूबपासून बनवलेली आहे. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले विविध प्राणी, हिरवळ, टाकलेल्या प्लास्टिक ड्रमपासून बनवलेल्या खुर्च्या, टी पॉय, रंगीबेरंगी बाटल्यांची बनवलेली स्वच्छ सर्वेक्षण २०२३ आणि पन्हाळागड या प्रतिकृती, पाहणाऱ्यांने पहात जावे आणि टाकाऊपासून टिकाऊ कसे बनवता येते यात मन गुंतवावे अशीच ही योजना.
पन्हाळगडावर एकूण ८५० कुटुंबे राहतात. नगरपरिषदेतर्फे त्यांच्याकडून दररोज साधारण नऊशे ते साडेनऊशे क्विंटल कचरा गोळा होतो. त्यात ६६ क्विंटल ओला कचरा, तर २९ क्विंटल सुका कचरा गोळा ह़ोतो. घरगुती घातक कचरा वेगळा गोळा केला जातो. कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते, तर सुका कचरा भंगार गोळा करणारे घेऊन जातात तसेच कोल्हापुरातील एका कंपनीला दिला जातो. निर्माण होणारे खत उत्कृष्ट दर्जाचे असल्याने शासनाकडून त्याला हरीत ब्रॅण्ड प्राप्त झाला आहे. महिन्याला निर्माण होणारे साधारण दोन टन खत नगरपरिषदेने लावलेल्या झाडांसाठी वापरले जाते तसेच नागरिकांनाही अल्पदरात विकले जाते.
निसर्गाची आवड असणाऱ्या पर्यटकांनी निश्चितच या ठिकाणाला भेट देऊन टाकाऊपासून टिकाऊ कसे बनवता येते आणि वेगळे उद्यान कसे असू शकते याचे निरिक्षण करण्याची गरज आहे.