पान ४

पान ४

03285

‘संजीवन’मध्ये पॉलिथीन पेपरचे वाटप
पन्हाळा : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात शेतकऱ्यांना शेततळ्यांमध्ये आच्छादन म्हणून वापरण्यात येणारे पॉलीथीन पेपरचे मोफत वाटप झाले. दालमिया भारत फौंडेशन यांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून १५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. उपप्राचार्य डॉ. सुहास सपाटे, फौन्डेशनचे नितीन कुरुळूपे, पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या हस्ते वाटप झाले. डॉ. सपाटे यांनी संजीवन परिवारातर्फे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले. नितीन कुरुळूपे यांनी मेमध्ये गांडूळ खत निर्मितीचे प्लास्टिक बॅग १०० शेतकऱ्यांना मोफत देणार असल्याचे जाहीर केले. सुदर्शन पाटील यांनी कागदाची निगा, विविध योजना व अनुदानाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सोमवार पेठ, इंजोळे, दळवेवाडी, बांदिवडे व घुंगुरमधील लोक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी दालमिया शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक, संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य डॉ. संजीव जैन व प्रा. जब्बार मेवेकरी यांचे मार्गदर्शन लाभले. विष्णू गुरवळ यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com