जीववाचण्यासाठी डँगो कुत्र्याने दिली बिबट्याशी झुंज

जीववाचण्यासाठी डँगो कुत्र्याने दिली बिबट्याशी झुंज

Published on

फोटो
...

‘डँगो’ कुत्र्याची साक्षात बिबट्याशी झुंज

पन्हाळा गडावरील डॉ. होळकर यांच्या बंगल्याच्या व्हरांड्यातील थरार

पन्हाळा, ता. ८ः पोटाची भूक भागविण्यासाठी पन्हाळ्यात बिबट्याचा फेरफटका नेहमी असतोच. शनिवारी पहाटे डॉ. राज होळकर यांच्या बंगल्याच्या व्हरांड्यात मात्र जीव वाचवण्यासाठी त्यांच्या ‘डँगो’ कुत्र्याने साक्षात बिबट्याशी झुंज दिली. हा प्रसंग बंगल्यातील सीसी टीव्ही कॅमेऱ्या‍त कैद झाला आहे
याबाबत अधिक माहिती अशी, डॉ. राज होळकर यांचा ‘राजाची झोपडी’ नावाचा बंगला तटबंदीच्या जवळच आहे. त्यामुळे त्यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्या येणे ही गोष्ट नित्याचीच झाली आहे. यापूर्वी बिबट्याने डॉक्टरांच्या अनेक कुत्र्यांना फस्त करत आपली भूक शमविली आहे. बंगल्याच्या जवळपास तीन ते चार एकराच्या परिसरात जंगल राखून ठेवले आहे. त्यामुळे या परिसरात रानडुक्कर, साळींदर, विविध प्रकारचे साप, ससे, अनेक पक्षी येथे बिनदिक्कत वावरत असतात.
शनिवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात बिबट्या बंगल्याच्या आवारात आला. आजूबाजूला कोनोसा घेत तो व्हरांड्याच्या दरवाजातून आत आला. व्हरांड्यातील खुर्चीवर एक कुत्रा झोपला होता, तर समोरच्या लोखंडी सोप्यावर ‘डँगो’ कुत्रा झोपला होता. दरवाजातून आत येताच खुर्चीवर झोपलेला कुत्रा बिबट्याच्या नजरेस पडला. कुत्राही बिबट्याच्या चाहुलीने जागा झाला. दोघांच्या झटापटीत हा कुत्रा बिबट्याच्या तावडीतून निसटला. दरम्यान, समोर झोपलेला ‘डँगो’ही जागा झाला. त्याने मात्र थेट बिबट्याशी झुंज घेतली. तब्बल चार वेळा बिबट्याच्या तावडीतून सहीसलामत सुटलेल्या डँगोने जिवावर बेतणारी वेळ येताच बिबट्याशी झुंज देण्याचे धाडस केले. डँगोने धारण केलेल्या रुद्रावतारापुढे शरणागती पत्करत बिबट्याने पलायन केले. डँगोचे धाडस पाहून दुसऱ्या कुत्र्यानेही बिबट्याचा पाठलाग केला. मात्र तो अद्यापपर्यंत परत आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.