पन्हाळा तालुक्यातील भूस्खालानाच्या धोक्याची मालिका सुरूच

पन्हाळा तालुक्यातील भूस्खालानाच्या धोक्याची मालिका सुरूच
Published on

03501
भाचरवाडी ते खडेखोळ रस्त्याला पडलेली भेग
...

भाचरवाडी- खडेखोळ रस्त्याला भेग

पन्हाळा, ता.२६ः पश्चिम पन्हाळ्यातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या- जाण्यासाठी सोयीचा असणाऱ्या पन्हाळा- कोतोली मार्गावरील भाचरवाडी ते खडेखोळ रस्त्याला ‘लासुनी’ नावाच्या परिसरात भेग पडली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील भुस्खलानाची धोक्याची मालिका सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे.
पश्चिम पन्हाळ्यातील कोतोली, कळे, बाजारभोगाव या परिसरातील नागरिकांकडून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. याच रस्त्याला भेग पडली आहे. भेग रुंदावल्यास परिसरातील नागरिकांचे दळणवळण बंद होणार आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम अनेक वर्ष प्रलंबित होते. तरी सुध्दा या रस्त्यावरुन लोकांचा रोजचा प्रवास सुरु होता. त्यातच गतवर्षी या रस्त्याला भेग पडून रस्ता खचला होता. यावर्षी देखील रस्ता खचल्याने वाहनधारकांसमोर संकट उभा राहिले आहे. या मार्गावरून चारचाकीबरोबरच परिसरातील शाळांच्या स्कूल बसची ये- जा असते. खचलेल्या रस्त्याच्या कडेला खोल दरी आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी या मार्गावरून प्रवास करताना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.