तहसील व नगरपरिषद प्रशासनाचा हॉटेल व्हॅली व्ह्यूच्या अतिक्रमणावर हातोडा

तहसील व नगरपरिषद प्रशासनाचा हॉटेल व्हॅली व्ह्यूच्या अतिक्रमणावर हातोडा
Published on

03815
पन्हाळ्यात अतिक्रमणावर हातोडा
पन्हाळा ता. २८ : येथील एका हॉटेलने शासकीय मुलकीपड जमिनीत परवानगी न घेता केलेल्या जमिनीमधील अतिक्रमणाची गांभिर्याने दखल घेऊन तहसील व नगरपरिषदेने संयुक्तपणे मोहीम राबवत झालेल्या अतिक्रमणावर हातोडा चालवून जमीन ताब्यात घेतली.
पन्हाळ्यातील सि.स.नं.६५२ या सरकारी मुलकीपड जमिनीत अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण मोजणी करून काढण्यासाठी भारतीय दलित महासंघाने तहसीलदारांना निवेदन देऊन उपोषण केले होते. त्या अनुषंगाने आज कारवाई झाली. सि.स.नंबर ६५२ मध्ये ३५५.०० चौ.मी.इतके क्षेत्र शासकीय मोजणी नुसार अतिक्रमित झाले होते.त्यामुळे तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी पन्हाळा नगरपरिषदेस अतिक्रमण काढण्याबाबत पत्र दिले. त्यानुसार नगरपरिषदेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली. मंगळवारी (ता. २८) पथकाने अतिक्रमित क्षेत्रातील प्रवेशद्वाराचे बांधकाम जेसीबी यंत्राच्या साह्याने पाडून जमीन ताब्यात घेतली. यावेळी हाॅटेलने वनविभाग व पुरातत्त्व विभाग यांच्या हद्दीत केलेले अतिक्रमण हटवावे व तेथील ऐतिहासिक बुरुज खुला करावा; अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले यांनी केली. मोहिमेत प्रशासकीय अधिकारी अमित माने, विश्वास रामाणे, पन्हाळा मंडल अधिकारी जे. आर. गोन्सालवीस, मदतनीस दामुअण्णा कांबळे, भारतीय दलित महासंघचे सदस्य, अमोल कांबळे, दयानंद शिवजातक, तुषार कांबळे, अमोल देसाई, राजू पाटील उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com