पन्हाळा तालुक्यातील ४३ अंगणवाडीना मिळणार मदतनीस

पन्हाळा तालुक्यातील 
४३ अंगणवाडीना मिळणार मदतनीस
Published on

पन्हाळ्यातील ४३ अंगणवाड्यांना
मिळणार मदतनीस
सकाळ वृत्तसेवा
पन्हाळा, ता. ३ : पंचायत समिती पन्हाळा एकात्मिक बाल विकास विभागाकडून तालुक्यातील ४३ अंगणवाडी केंद्रांत मदतनीस पदाची भरतीसाठी अर्जाची मागणी केली आहे. यामुळे तालुक्यातील ४३ अंगणवाड्यांना मदतनीस मिळणार आहेत.
२ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार ही भरती होणार आहे. या भरतीसाठीचे अर्ज संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी १८ मार्चपूर्वी अर्ज करायचे आहेत. याबाबत कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी नयना पाटील यांनी केले आहे. मदतनिसांची भरती होणारी गावे पुढीलप्रमाणे : काखे, डुबाळवाडी, नावली, धारवाडी, कोतमिरवाडी,बोरिवडे, तुरुकवाडी, कुशिरे ठाणे, कोलोली, कणेरी-धनगरवाडा, कणेरी-गवळेवाडी, बांदिवडे, चव्हाणवाडी, गोलिवडे/जाधववाडी, मुडेकरवाडी, पिंपळे/जाधववाडी, चौगुलेवाडी, मेंगाणेवाडी, पानारवाडी, पोवारवाडी, धनगरवाडा, जाधववाडी, खामणेवाडी, मुसलमानवाडी, सुंभेवाडी, कांडरवाडी, काळजवडे, मानवाड, आढाववाडी, कोलिक, गोठणे, पडसाळी, सोनारवाडी/पिसात्री, पोर्ले बोरगांव, पोर्ले जाधववाडी, पोहाळवाडी, चौगलेवाडी, कसबा बोरगांव/खोतवाडी, वाळोली/शांतीनगर, चिखलकरवाडी, उंड्री/खोतवाडी, निवडे/मोरेवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

two levels of mental illness women empowerment
Bribe Case
MIDC
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com