

04405
राज्य चित्रकला स्पर्धेत सचिन घोडे प्रथम
पन्हाळगडावर आयोजन; राज्यातील चित्रकारांचा सहभाग
पन्हाळा; ता. ३० ः भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या सदराखाली जिल्ह्याचा मानबिंदू असलेल्या पन्हाळगडाचा समावेश प्रस्तावित आहे. त्यास अनुसरून पन्हाळा नगरपरिषदेने गडावर आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धेत राज्यभरातील चित्रकारांनी गडाचे सौंदर्य रेखाटलेल्या चित्रामधील अहमदनगरच्या सचिन घोडे यांच्या चित्रास प्रथम क्रमांक मिळाला.
रविवारी (ता. २२) पन्हाळा नगरपरिषदेने घेतलेल्या भव्य राजस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये अहमदनगरच्या सचिन घोडे यांच्या चित्राला प्रथम क्रमांकाचे ४४,४४४ रु., हिंगणेखुर्द, सिंहगड रोड, पुणे येथील मेघराज फरकाले यांच्या चित्राला द्वितीय क्रमांकाचे ३३,३३३ रुपयांचे तर इचलकरंजीच्या महेश सौंदते यांच्या चित्राला तृतीय क्रमांकाचे २२,२२२ रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. तसेच कोल्हापूरच्या प्रकाश रमेश मोहिते व सांगलीच्या मंगेश पाटील यांना प्रत्येकी ३,३३३ रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झाले. परीक्षक निवडीतून रत्नागिरी येथील प्रणय खराडे व सांगलीच्या औदुसिध्द करजगी यांना प्रत्येकी २२२२ रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रकार प्रा. अजय दळवी, चित्रकार-दिग्दर्शक स्वप्नील पाटील, प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांनी काम पहिले. सर्व विजेत्यांनी २ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहावे; असे आवाहन मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.