

04462
हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात
पन्हाळा तालुका; सोयाबीन, भुईमूग ज्वारीची अवस्था बिकट
सकाळ वृत्तसेवा
पन्हाळा, ता. १७ ः पन्हाळा तालुक्यात बरसत असलेल्या परतीच्या पावसाने तालुक्याला झोडपून काढल्याने खरिपातील हजारो हेक्टरवरील काढणीस आलेल्या भातासह अन्य पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे भरपाईची मागणी जोर धरत आहे.
तालुक्यात सुगी सुरू असून शेतकरी कुटुंबीयासह प्रामुख्याने भात व सोयाबीन कापणी-मळणीच्या कामात गुंतला आहे. शेतकऱ्यांची काढणी, मळणीची धांदल सुरू असतानाच दररोज सायंकाळी पडणारा परतीचा पाऊस डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाचे डोळ्यांदेखत होणाऱ्या नुकसानीने शेतकरी हतबल झाला आहे. काढणीस झालेल्या पिकांची पिंजर वगैरे वैरण पावसाने कुजू लागली आहे. पिकांची वाळवणीत येणारी अडचण, जनावरांच्या वर्षाच्या चाऱ्याच्या चिंतेने शेतकरी धास्तावला आहे. भात पीक पूर्ण जमीनदोस्त झाले आहे, तर सोयाबीन, भुईमूग व ज्वारी पिकांची अवस्था बिकट बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून कृषी विभागाने पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात पीकनिहाय पेरणी क्षेत्र
भात ८,७३६ हेक्टर
भुईमूग ३,५६५ हेक्टर
सोयाबीन १,७५५ हेक्टर
ज्वारी २५० हेक्टर
काढणी न झालेले अंदाजित क्षेत्र
भात ५,२०० हेक्टर
भुईमूग २००० हेक्टर
सोयाबीन ५५० हेक्टर
ज्वारी अद्याप कापणी नाही
ांांकोट
परतीच्या पावसामुळे पन्हाळा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी सुरू आहे. त्याबाबत वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे.
- काव्यश्री घोलप, तालुका कृषी अधिकारी, पन्हाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.