

04720
पन्हाळगडावर ''जय शिवाजी जय भारत'' पदयात्रा
हजारो शिवभक्तांची उपस्थिती; प्रशासनाचे नेटके नियोजन
पन्हाळा, ता. १७ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने १९ फेब्रुवारी २०२५ ला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राज्यव्यापी ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा आयोजित करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशाने पन्हाळगडावर निघालेली ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा नेटक्या नियोजनात व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात झाली.
सकाळी साडेसातला आमदार डॉ. विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या हस्ते ध्वज फडकावून शिवमंदिरापासून जय शिवाजी जय भारत पदयात्रेला सुरवात झाली. ही पदयात्रा सज्जाकोठी, दुतोंडी बुरुज, राजदिंडी मार्गे मुख्य रस्त्यावरून बाजीप्रभू देशपांडे पुतळा, तीन दरवाजा, बाजारपेठेतून परत शिवमंदिराजवळील कार्यक्रमस्थळी आली. पदयात्रेत संजीवन विद्यानिकेतन पन्हाळा, नरकेज पब्लिक स्कूल, पन्हाळा हायस्कूल, कन्या हाय. बुधवार पेठ, छत्रपती हायस्कूल राक्षी, फोर्ट इंटरनॅशनल वाघबीळ, तात्यासाहेब कोरे इंग्लिश अॅकॅडमी, पन्हाळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल बोरपाडळे, देवाळे हाय. देवाळे,Øश्री वारणा विद्यालय वारणानगर, यशवंत हाय, कोडोली, ज्योतिलिंग इंग्लिश स्कूल माले, यशवंत इंटरनॅशनल अॅकॅडमी, कोडोली, सारधी संस्था कोल्हापूर असे १४ शाळांचे तीन हजार विद्यार्थी व पन्हाळगड तसेच परिसरातील शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
चौकट...
हे ठेरले पदयात्रेचे आकर्षण
पदयात्रेत सहभागी ‘संजीवन’ची नववीतील विद्यार्थिनी भक्ती पोवार भारतमातेच्या रूपात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात शिक्षक बँकेचे संचालक व पोहळवाडी येथील प्राथमिक शिक्षक अमर वरुटे पदयात्रेचे आकर्षण ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.