

04763
पन्हाळा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन
पन्हाळा, ता. ४ : किल्ले पन्हाळगडावर ४ ते ७ मार्चदरम्यान संस्कृती, इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशाने शासनाच्या पर्यटन विभागामार्फत व जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने आयोजित पन्हाळा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन पन्हाळा शाहूवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते झाले.
पर्यटन विकासाच्या उद्देशाने आयोजित चार दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे सायंकाळी ५ वाजता आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. महोत्सवात ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरले आहे. बुधवारी (ता. ५) सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील जाज्वल्य आणि प्रेरणादायी प्रसंगांवर आधारित ऐतिहासिक नृत्य-नाट्य व शिवजन्म ते शिवराज्यभिषेक सोहळा, सायंकाळी ५.३० वाजता संस्कारप्रस्तुत जीवनगाणे कार्यक्रमात झी सारेगम विजेता प्रसेनजीत कोसंबी व झी सारेगम फेम स्वरदा गोडबोले यांचा मराठी व हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आहे. गुरुवारी (ता. ६) लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते किल्ल्यावर उभारलेल्या १३डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम लघुपटाचे अनावरण होईल. शुक्रवारी (ता. ७) सकाळी ९ पासून अंबरखाना परिसरात निमंत्रित चित्रकार, शिल्पकार यांची प्रात्यक्षिके, सायंकाळी ४ वाजता जिल्ह्यातील गडकिल्ले विषयावर इन्स्टाग्राम रिल्स, यु ट्युब व्हिडीओ व फोटोग्राफी स्पर्धा व पारितोषिक वितरण होईल. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा; असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.