पोर्ले-उद्घाटन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-उद्घाटन बातमी
पोर्ले-उद्घाटन बातमी

पोर्ले-उद्घाटन बातमी

sakal_logo
By

01447
केर्ले ः येथे संस्थेच्या प्रारंभी मार्गदर्शन करताना चेतन नरके व मान्यवर.

सहकाराचे जाळे विस्तारावे ः नरके
पोर्ले तर्फे ठाणे ः केर्ले (ता. करवीर) येथील नाईन प्लॅनेट गृहतारण सहकारी संस्थेचा प्रारंभ गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांच्या हस्ते बाबासाहेब चौगुले यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी केडीसीसी बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) होते. नरके म्हणाले, ‘ग्रामीण भागात सहकाराचे जाळे विस्तारावे. तरुणांनी नाईन प्लॅनेटसारख्या संस्था निर्माण केल्या तर सहकार टिकेल.’ यावेळी केर्ले सरपंच उषाताई माने, मार्केट कमिटी सदस्य दशरथ माने, बबन पडवळ, श्रीपतराव माने, जगन्नाथ माने संस्थेच्या अध्यक्षा रूपाली गोसावी, उपाध्यक्ष अनिल शेलार, सदस्य प्रदीप घाटगे, विशाल माने, अनिल पिष्टे, भीमराव बुचडे, विजय गवळी, उमेश कुंभार, अभिजित पाटील, जयश्री कुंभार, युवराज कांबळे, सहकार अधिकारी अजित गोसावी व तलाठी सचिन कुंभार उपस्थित होते. प्रदीप घाटगे यांनी स्वागत, उमेश कुंभार यांनी प्रास्ताविक केले. विजय गवळी यांनी आभार मानले.