पोर्ले-पाऊस

पोर्ले-पाऊस

Published on

आसुर्ले पोर्ले परिसरात दमदार पाऊस
पोर्ले तर्फ ठाणे ः आसुर्ले पोर्ले परिसरात दहा-बारा दिवसांपासून दमदार पावसाने सुरवात केल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. दररोज दिवसरात्र तुरळक व दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे माळरानातील पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात यंदा वळवाने पाठ फिरवली. मृग कोरडाच गेल्याने  शेतकरी चिंतेत पडला.पडलेल्या दहा-बारा दिवसांपासून पडणाऱ्या दमदार व तुरळक पावसाने माळरानातील पिकांना जीवदान मिळाले असून सध्या पाऊस पडत आहे. पण पावसाला जोर नाही. दिवसभरात ऊन -पाऊस खेळ सुरू आहे. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने गटारे वाहू लागली आहेत, तर कासारी नदीला नवे पाणी आले आहे. सध्या डोंगरमाथ्यावर मशागत करून भुईमूग, तूर, भात आदी खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.