पोर्ले-लेख१ऑगस्ट पुरवणीत घेण्याची.

पोर्ले-लेख१ऑगस्ट पुरवणीत घेण्याची.

डोके
मा. परशराम खुडे वाढदिवस विषेश
...................
01729, 01730
---------

विकासाभिमुख नेतृत्व
सामान्य लोकांच्या हिताचा ध्यास घेऊन पोर्ले तर्फे ठाणेसारख्या ग्रामीण भागात सहकाराचे जाळे निर्माण करण्याचा मानस असणारे उदय समूहाचे नेते परशराम गोविंद खुडे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात १ ऑगस्ट १९५४ ला झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर पोर्ले व माध्यमिक शिक्षण श्री हनुमान हायस्कूल केर्ले येथे झाले. केदारलिंग भात गिरणीमध्ये क्लार्क म्हणून काम करत असताना वयाच्या चोवीसाव्या वर्षी १९७८ मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली. १९७८ ते२००० सलग २२ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना १९८० ते सन १९८४ व १९९४ ते १९९५ असे दोन वेळा सरपंच पदाची धुरा सांभाळली. पोर्ले तर्फे ठाणेत केलेल्या विकासाभिमुख कामामुळे लोकांनी त्यांना ‘सरपंच साहेब’ ही उपाधी दिली.
................

१९८७ मध्ये श्री उदय दूध संस्थेच्या स्थापनेत मोलाचा वाटा आहे. तसेच संस्थेचे संस्थापक, संचालक, अध्यक्ष म्हणून काम करत असताना संस्थेचे दूध संकलन सहकाऱ्यांच्या मदतीने प्रतिदिन ५००० लीटर पर्यंत वाढविण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य आहे. तसेच पश्चिम पन्हाळा परिसरात अग्रेसर असणाऱ्या श्री राम विकास सेवा संस्थेत १९८७ पासून कामकाज करत करत आहेत. ते सध्या संस्थेचे विद्यमान चेअरमन आहेत. श्री उदय सहकारी पतसंस्था व श्री मसाई देवी सहकारी पाणीपुरवठा या संस्थेच्या स्थापनेत मोलाचे सहकार्य केले. उदय समूहाच्या या संस्थांच्या माध्यमातून सहकारामध्ये अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे.
राजकीय व सहकारातील कामांची पोचपावती म्हणून कै. आमदार संजयसिंह गायकवाड, कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष कै. भगवानराव सरनोबत व गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण नरके यांनी यशवंत पन्हाळा तालुका खरेदी-विक्री संघ व १९९७ मध्ये कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून संधी दिली.
२०१५ ते २०२० या कालावधीत पुन्हा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक व २०१५-१६ या काळात आमदार डॉ. विनय कोरे यांनी सभापती पदाची संधी दिली. वयाच्या ७० व्या वर्षांत पदार्पण करत असताना आजही त्यांची राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा उत्साह युवा कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. या मितभाषी व कणखर नेतृत्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.

शब्दांकन व पुरवणी संकलन ः
वसंत ग.पाटील (पोर्ले तर्फ ठाणे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com