पोर्ले-शाळेत कार्यक्रम

पोर्ले-शाळेत कार्यक्रम

01777
पोर्ले तर्फ ठाणे : आ. ब. सरनोबत हायस्कूलमध्ये माता मेळाव्यात डॉ. अमृता निकम यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सीमा सांगरूळकर व मान्यवर उपस्थित होते.


आनंदीबाई सरनोबत हायस्कूलमध्ये माता मेळावा
पोर्ले तर्फ ठाणे : बालकांचे हक्क आणि संरक्षण कायदा १९८९ अंतर्गत सखी सावित्री समितीतर्फे आसुर्ल-पोर्ले-येथील आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूलमध्ये माता मेळावा झाला. कार्यक्रमास पोर्ले आरोग्य केंद्रच्या डॉ. अमृता निकम, समुपदेशक दिपाली चव्हाण, अंगणवाडी सेविका शोभा दुबुले, ग्रामपंचायत सदस्य आरती पाटील, पालक सदस्य शितल सासने मुख्याध्यापिका उपस्थिते होते. सखी सावित्री समितीची मूळ संकल्पना व त्या अंतर्गत राबविले जाणारे विविध उपक्रम याची माहिती मुख्याध्यापिका सीमा सांगरुळकर यांनी दिली. डॉ. निकम यांनी महिलांचे विविध आजार त्याची कारणे व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. समुपदेशक दिपाली चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. हरित सेना प्रमुख पोद्दार यांनी तृणधान्याबद्दल माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com