

02833
केर्लेतील खूनप्रकरणी दोषींवर
कारवाईची शोकसभेत मागणी
पोर्ले तर्फ ठाणे ः केर्ले (ता. करवीर) येथील महेंद्र प्रशांत कुंभार याचा (३ जून) रोजी प्रेमाच्या त्रिकोणातून खून झाला. खुनात आणखी काहीजन सामील आहेत. यासाठी मंगळवारी केर्ले पडवळवाडी, हनुमाननगरमधील व्यवहार बंद ठेवून रात्री शोकसभा घेण्यात आली. यावेळी अनेक लोकांनी व महिलांनी मनोगत व्यक्त केली. यात महेंद्र कुंभारला श्रद्धांजली वाहून ज्यांनी त्याचा खून केला आहे त्यास कठोर शिक्षा व्हावी. याप्रकरणात आणखी काहीजण सामील आहेत याचा पोलिसांनी कसून तपास करावा. यावेळी महिलांनी बोलताना अशा घटना घडू नयेत यासाठी आपल्या मुलांवर आई-वडिलांनी लक्ष ठेवावे. मुले काय करतात, कुणाच्या संगतीत वावरतात,त्याचे मित्र कोण आहेत यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.’ बंदवेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी करवीर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त होता. गावातील व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.