पोर्ले - विद्युत खांब पडला.

पोर्ले - विद्युत खांब पडला.
Updated on

02838
पोर्ले तर्फ ठाणेत
विद्युत खांब कोसळला
पोर्ले तर्फ ठाणे; ता. १६ ः येथील पाटील वसाहतीत आज सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे निलगिरीचे झाड उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर पडल्यामुळे जवळचा विद्युत खांब कोसळला. विद्युतवाहिन्या तुटून यवलूज-पोर्ले रस्त्यावर पडल्या. महावितरण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे अनुचित प्रकार घडला नाही.
पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील पाटील वसाहतीजवळील खोपकर ग्रुप डीपीजवळून जाणाऱ्या केर्लेत येथील आलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर निलगिरीचे झाड उन्मळून पडले. त्यावेळी तेथून जवळचा विद्युतखांब पडला. त्यामुळे विद्युत वाहिन्या तुटून जमिनीवर पडल्या. ही माहिती शेतक-यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी तत्काळ विद्युत पुरवठा खंडित केला. यवलूज-पोर्ले रहदारीच्या रस्त्यावर विद्युत वाहिन्या तुटून पडल्या होत्या; पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे अनुचित प्रकार घडला नाही. येथून विहिरीवरील शेती पंप व वसाहतीतील घरगुती विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा; अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com