
दिंडेवाडी येथे गुणगौरव सोहळा
01842
दिंडेवाडीत गुणवंतांचा सत्कार
पिंपळगाव ः जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन प्रशासन अधिकारी देवानंद ढेकळे यांनी व्यक्त केले. ते शंकर पाटील माध्यामिक विद्यालय, दिंडेवाडीत सत्कारावेळी बोलत होते. मुख्याध्यापक यू. एस. मुळीक अध्यक्षस्थानी होते. माजी विद्यार्थी देवानंद ढेकळे, संतोष गुरव व सचिन इंदुलकर यांच्या संकल्पनेतून सहा वर्षे विद्यार्थी सत्कार आयोजित केले जातात. दहावी शिष्यवती, एनएमएमएस विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार झाला. यावेळी संतोष गुरव, सचिन इंदुलकर, संतोष पाथरवट, संगीता मगदूम, शंकर येजरे, एस. पी. मुळीक, बाळासाहेब शिऊडकर उपस्थित होते. मुख्याध्यापक उत्तम मुळीक यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सुधाकर मुळीक यांनी सूत्रसंचालन, आभार रमेश पाटील यांनी मानले.