पिंपळगाव येथे रविवारपासून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
पिंपळगाव येथे रविवारपासून
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
पिंपळगाव, ता. ११ ः पिंपळगाव (भुदरगड) येथे १५ ते १७ डिसेंबरअखेर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होत आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती भुदरगड, पिंपळगाव विद्यालय, केंद्र शाळा पिंपळगाव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रविवारी (ता. १५) होईल. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे असतील. ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
सोमवारी (ता. १६) दिवसभर विज्ञान प्रदर्शनास तालुक्यातील शाळांच्या भेटी होतील, तर मंगळवारी (ता. १७) बालकुमार फाउंडेशन प्रस्तुत ‘प्रिय आई-बाबा’ हा कविता, गाण्यांचा कार्यक्रम होईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या उपस्थितीत वैज्ञानिक साधने सादरीकरण होईल. यावेळी सरपंच अश्विनी भोपळे, विस्तार अधिकारी डी. डी. पाटील, प्रबोध कांबळे, धनाजी माध्याळकर, उत्तम पाटील, केंद्रप्रमुख विठ्ठल मगदूम उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनास जास्तीत जास्त शाळा, विद्यार्थी, पालक यांनी भेट द्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, पिंपळगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदा लांबोरे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका शोभा हेरेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

