बारवे येथील पांडवकालीन मंदीर भक्तांचे श्रध्दा स्थान

बारवे येथील पांडवकालीन मंदीर भक्तांचे श्रध्दा स्थान

Published on

02646
बारवेच्या पांडवकालीन
शिवमंदिरात कार्यक्रम

पिंपळगाव, ता. २४ ः बारवे (ता. भुदरगड) येथील प्राचीन पांडवकालीन महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (ता. २६) विविध कार्यक्रम होतात.
गारगोटीपासून किल्ले भुदरगड मार्गावर दहा किलोमीटरवर मोठे बारवे (ता. भुदरगड) येथे प्राचीन पांडवकालीन महादेव मंदिर आहे. मंदिरात बारा जोतिर्लींग आहेत. बारा शिवलिंगांवरूनच गावाचे बारवे असे नामकरण प्राचीन काळातच झाले.
दरवर्षी येथे महाशिवरात्री यात्रा होते. मंदिराबद्दल आख्यायिका अशी, ‘अज्ञातवासात असताना पांडव किल्ले सामानगड, भुदरगड परिसरातील अरण्यात होते. येथे एका रात्रीत पांडवांनी मंदिर बांधकाम सुरू केले. पहाटे कोंबडा आरवल्याचा आवाज झाल्यावर पांडव मंदिराचे बांधकाम अर्धवट सोडून अज्ञातवासात गेले.’ मंदिर प्रवेशव्दारात दगडी नंदीची मूर्ती आहे. प्राचीन काळात नंदीच्या गळ्यात पितळी चाळ होता.१९६५ला तळ्यातील गाळ काढताना हा पितळी चाळ, जुन्या काळातील बांधकाम हत्यारे सापडली होती. तत्कालीन लोकांनी वस्तू पुरातत्त्व विभागात जमा केल्या. तळ्यातील पाणी सायफन पध्दतीने गावात पिण्यासाठी पोहचवले आहे. मंदिराखाली प्राचीन विहीर असल्याचे वास्तूशास्त्र अभ्यासक सांगतात. मंदिर परिसरात प्राचीन विरगळ आहेत. परिसरात अनेक ठिकाणी घडई केलेले प्राचीन दगड सापडतात. महाशिवरात्रीला येथे महाप्रसाद, सात दिवस शिवनाम जागर सप्ताह होतो. पर्यटन विकासातून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून विकासकामे झालेली आहेत. उर्वरित कामे सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com