पेठवडगाव:शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग,सात लाखाचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग,सात लाखाचे नुकसान
पेठवडगाव:शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग,सात लाखाचे नुकसान

पेठवडगाव:शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग,सात लाखाचे नुकसान

sakal_logo
By

मिणचे येथे शॉर्टसर्किटने उसाला आग

पेठवडगाव, ता. २ : मिणचे येथे ट्रॅक्टरचा विद्युत प्रवाहित तारेला जोरदार धक्का बसून उसाला शॉर्ट सर्किटने आग लागली. यामध्ये साडेचार एकरातील उसाचे नुकसान झाले. या आगीत सात लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
मिणचे (ता. हातकणंगले) येथील सुनील आण्णासो देसाई यांच्या गट नं ६२६ मध्ये ऊस तुटलेल्या क्षेत्रात नामदेव विष्णू पाटील (रा. मौजे तासगाव) हे ट्रॅक्टरने शेणखत आणून टाकत होते. या वेळी महावितरणच्या विद्युत खांबाच्या वायरला ट्रॅक्टरने धक्का दिला. त्यामुळे या विद्युत प्रवाहित खांब  शेतात तुटून खाली पडला. यामुळे सुनील आण्णासो देसाई, शामराव श्रीपती माळी (रा. मिणचे), देवेंद्र लिंगाप्पा पोळ, संपत बापू पाटील, निर्मला धोंडिराम जाधव, भीमराव श्रीपती यादव (सर्व, रा. पेठवडगाव) यांच्या शेतातील साडेचार ते पाच एकरातील ऊस, ठिबक सिंचन पाईप, प्लास्टिक पाईप आगीत जळाल्या. तसेच वीज वितरण कंपनीचे खांब व कंडक्टर्स मिळून साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग अग्निशमन दलाच्या दोन फेऱ्यांनी तसेच युवकांनी बाजूचा ऊस तोडून आग आटोक्यात आणली. ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान, या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.