Fri, Jan 27, 2023

डॉ. श्रावणी महाजनला सुवर्ण पदक
डॉ. श्रावणी महाजनला सुवर्ण पदक
Published on : 23 January 2023, 1:04 am
01874
डॉ. श्रावणी महाजन
हिला सुवर्णपदक
पेठवडगाव : येथील डॉ. श्रावणी उदय महाजन बीएएमएस शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत कायचिकित्सा विषयात महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळवले. ती सोलापूर येथील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय येथून आयुर्वेदिक डॉक्टर झाली.
श्रावणी हिचे दहावीचे शिक्षण वडगाव येथील होलि मदर इंग्लिश मेडीयम स्कूल, बी. वाय. कॉलेज येथे बारावी, त्यानंतर मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे झाले. महाविद्यालयात तिने सलग चार वर्षे पहिला क्रमांक मिळवला आहे. तिच्या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद दोशी, डॉ. प्रदीप कोठाडिया, सहसचिव डॉ. आदर्श मेहता, प्राचार्या डॉ. वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ. शांतिनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी अनुप दोशी यांचे प्रोत्साहन लाभले.