प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस
प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस

प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस

sakal_logo
By

01896
वाठार तर्फ वडगाव: येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. आमदार जयंत आसगावकर, विजयसिंह माने, प्रवीण यादव, मनिषा माने, दादासाहेब लाड आदी उपस्थित होते.
-----------------
प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस
आमदार विनय कोरे; अशोकराव माने पॉलिटेक्निकमध्ये विज्ञान प्रदर्शन
पेठवडगाव, ता. ७ : विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे, असे प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केले.
येथील श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप व जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अशोकराव माने पॉलिटेक्नीक वाठार येथे आयोजित ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार जयंत आसगावकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड, जिल्हा परिषद माजी सदस्या सौ. मनिषा माने, माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, विजयसिंह माने उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने केली. वैज्ञानिक पद्धतीने ज्योत प्रज्वलित करून उद्‍घाटन फलकाचे रिमोटद्वारे अनावरण केले. आमदार जयंत आसगावकर म्हणाले, ‘प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणे गरजेचे आहे. विविध वैज्ञानिक उपकरणाला पेटंट मिळवून देण्यासाठी सहकार्य करू तसेच ग्रंथ चळवळ टिकवण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.’
संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने म्हणाले, ‘विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून संशोधनाची वृत्ती वाढीस लागून त्यातून संशोधक निर्माण व्हावा. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ शिक्षक नेते दादासाहेब लाड यांचे भाषण झाले.
डाएटचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, वैभव पाटील, अजय पाटील, अर्चना पाथरे, डॉ. एच. टी. जाधव, बाबासाहेब मुळीक, डॉ. सचिन पाटील, विजय ओतारी, प्रा. पी. बी. घेवारी आदी उपस्थित होते. विनायक गुरव, उमा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. युवराज गुरव यांनी आभार मानले.