
सायरस पुनावाला स्कुलमध्ये मातृ दिन साजरा
पूनावाला स्कूलमध्ये
मातृ-पितृ दिन
पेठवडगाव, ता. १४ : येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त मातृ पितृ दिन साजरा केला. विद्यार्थिनी आपल्या वडिलांचे औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा विजयादेवी यादव होत्या. प्रमुख म्हणून प्राचार्य डॉ. सरदार जाधव होते. दरम्यान, समाजासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या घटकांबद्दल कृतज्ञता व प्रेम व्यक्त करत शाळेतील विद्यार्थ्यांनी सदैव सेवेत असणाऱ्या वडगाव न्यायालय, पोलिस स्टेशन, नगरपालिका कार्यालय, सरकारी दवाखाना, महावितरण केंद्र, एसटी बस स्थानक, टेलिफोन ऑफिस, तलाठी कार्यालय, सफाई कामगार येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या सेवेबद्दल गुलाबपुष्प देऊन प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली.
संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिया आणि राजलक्ष्मी जगताप यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी नीता मोरे, नीलिमा पाटील, मनीषा पंचाळ, अनुष्का पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सागर पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, सचिव विद्याताई पोळ, सागर फरांदे, मिनल पाटील, माधवी सावंत यांचे सहकार्य मिळाले.