आदर्श गुरुकुल विद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्श गुरुकुल विद्यालयाचे यश
आदर्श गुरुकुल विद्यालयाचे यश

आदर्श गुरुकुल विद्यालयाचे यश

sakal_logo
By

01958

आदर्श गुरुकुल विद्यालयाचे यश

पेठवडगाव : शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धा यवतमाळ येथे झाल्या. शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात नागपूर संघाला ८ विरुद्ध २ अशी लढत देऊन अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यामध्ये पुणे संघाबरोबर सामना खेळत चांगली लढत देत असताना २ विरुध्द ४ असा सामना गमवावा लागला. आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक व कोल्हापूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव रमेश भेंडीगिरी, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव डॉ. प्रदीप तलवेलकर, राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक दीपक पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, सचिवा एम. डी. घुगरे यांचे प्रोत्साहन लाभले.