

02030
चारचाकीच्या धडकेत
मोटरसायकलस्वार ठार
राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाट्याजवळ अपघात
पेठवडगाव, ता.१६: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकलला पाठीमागून भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. हा आपघात सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अंबप फाट्याजवळ पेट्रोल पंपासमोर झाला. अजित रामगोंडा भंडे(वय ३२, रा.वसगडे,ता.करवीर)असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अजित भंडे मोटरसायकलने (एम.एच.०९,बी.एल १९२६) वाठारकडून वसगडेला जात होते, तर मुंबईहुन कोल्हापूर मार्गे नवदांपत्य गोव्याला चारचाकीने (एमएच ०५-ईक्यू ६२८२) जात होते. अंबप फाट्याजवळ मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. यावेळी मोटरसायकलस्वार अजित पाटील हे गाडीवरून उडून खाली पडले. याबरोबरच त्यांच्या डोक्याचे हेल्मेटही खाली पडले. यात त्यांच्या तोंडाला व डोक्याला मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक जोराची असल्याने दोन्ही गाड्या महामार्गाच्या कडेला सहा पदरीकरणासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावर खाली गेल्या होत्या. अपघातानंतर वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती. वडगाव पोलिस व महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्र यांनी वाहतूक सुरळीत केली. अजित भंडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अपघाताची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली असून तपास पोलिस व्ही.एन.तांबे, योगेश राक्षे अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.