

02320
...
सिमेंट ब्लॉकला दुचाकी
धडकून तरुण जागीच ठार
दोघे गंभीर : मंगरायचीवाडी फाट्याजवळ अपघात
पेठवडगाव, ता. ३ : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मंगरायाचीवाडी फाट्याजवळ दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला. आविष्कार शरद दाभाडे (वय २२, रा. काखे, ता. पन्हाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोडोली येथे नर्सिंगचे शिक्षण घेणारा आविष्कार दाभाडे हा रविराज पाटील याच्यासह त्याच कॉलेजमध्ये शिकणारा आपला मित्र प्रताप गुलाब पाडवी (वय २०, मूळ रा. जुगलखेत, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हा रात्री नंदुरबारहून कोल्हापूर येथे आला असल्याने त्याला आणण्यासाठी गेले होते. त्याला घेऊन ते दुचाकी (एमएच-०९ जीएच-४५८१) वरून कोल्हापूरकडून वाठारच्या दिशेने येत होते. मंगरायाचीवाडी फाट्याजवळ महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या वळणासाठी म्हणून लावलेल्या सिमेंटच्या ब्लॉकला जोरात त्यांची दुचाकी धडकली. या धडकेत अविष्कार याच्या डोक्याला, हाताला व पायाला मार लागल्याने तो गंभीररीत्या जखमी होऊन जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र प्रताप पाडवी व रविराज कुबेर पाटील(वय २२, रा. काखे) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून आविष्कारचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. आविष्कार हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.