पेठवडगाव:एकाच कुटूंबातील पाचजन बेपत्ता

पेठवडगाव:एकाच कुटूंबातील पाचजन बेपत्ता

Published on

नात्यातील चार मुलींना
घेऊन विवाहिता बेपत्ता

मिणचे येथील खळबळजनक घटना

पेठवडगाव, ता. २३ : मैत्रिणीकडे जातो असे सांगून विवाहित महिला नात्यातील चार मुलींना घेऊन बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना वडगाव-मिणचे रोडवर मिणचे गावच्या हद्दीत घडली. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांपैकी दोन वर्षांच्या मुलीसह तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यामुळे नातेवाईकांचे धाबे दणाणले.

वडगाव-मिणचे रोडवर मिणचे हद्दीत वसंत जाधव यांचा विटभट्टी व्यवसाय आहे. राकेश सावकार जाधव (२६) हे कुटुंबासह मजूर म्हणून कामास आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास जाधव यांची पत्नी काजल राकेश जाधव (वय २५) या मैत्रीण मीना पोवार यांच्याकडे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडल्या. त्या त्यांची दोन वर्षाची मुलगी व नातेवाईकांच्या १४ ते १६ वयोगटातील आणखी तीन मुली सोबत घेऊन गेल्या. त्या रात्री उशिरापर्यंत परत आल्या नाहीत. म्हणून राकेश जाधव यांनी तिच्या मैत्रिणीकडे संपर्क केला असता त्या येथे आल्या नसल्याचे उघडकीस आले. नातेवाईकांनी शोधा-शोध करूनही त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री उशिरा वडगाव पोलिस ठाण्यात वर्दी दिली. बेपत्ता होण्याचे कारण समजू शकलेले नाही. त्यामुळे पोलिस त्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com